फटाक्‍यांमुळे निद्रानाशाचा धोका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

मुंबई - फटाक्‍यांमुळे श्‍वसनाला तसेच कान आणि डोळ्यांना त्रास होतो. त्यामुळे झोप उडण्याबरोबरच भूक मंदावण्याचीही शक्‍यता असते, असे महापालिकेच्या विशेष अहवालात म्हटले आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्‍वसन विकार असलेल्या रुग्णांवर फटाक्‍यांचा सर्वाधिक दुष्परिणाम होतो. रात्री १० ते सकाळी ६ दरम्यान मोठ्या आवाजाचे फटाके फोडण्यावर बंदी आहे; परंतु त्याचे पालन होत नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

फटाक्‍यांचा परिणाम फक्त ध्वनी आणि वायुप्रदूषणापुरता मर्यादित नसून फटाके मानवी आरोग्यावरही दूरगामी परिणाम करतात, असे पालिकेच्या पर्यावरण विभागाने पालिका रुग्णालयांतील तज्ज्ञांशी चर्चा करून तयार केलेल्या अहवालात म्हटले आहे. फटाक्‍यांमुळे तणाव, थकवा येणे, एकाग्रता भंग पावणे, मळमळ आदी दुष्परिणाम मानवी आरोग्यावर होतात. काही वर्षांत रंगीत फटाक्‍यांचे प्रमाण वाढले आहे. फटाक्‍यांमुळे हवेत जड धातू, नायट्रोजन डायऑक्‍साईड, सल्फरडाय ऑक्‍साईड तसेच तरंगत्या धूलीकणांचे प्रमाण वाढते. त्याचा श्‍वसनावर परिणाम होतो. दमेकऱ्यांचा विकार बळावतो. इतरांच्या फुप्फुसाच्या क्षमतेवर परिणाम होतो. ध्वनिप्रदूषण कायद्यानुसार रात्री १० पासून सकाळी ६ पर्यंत फटाके वाजवण्यावर बंदी आहे. या वेळेत फटाके वाजवणाऱ्यांवर फौजदारी कारवाई होऊ शकते.

बहिरेपणाचाही धोका
फटाक्‍यांच्या आवाजामुळे बहिरेपण येण्याचा धोका आहे. कानाच्या आतील वाहिन्यांना आणि पेशींना सूज, कानाचा पडदा फाटणे अथवा छिद्र पडणे आदी धोके असतात.

डोळ्यांवरही परिणाम 
फटाक्‍यांमुळे कायमचा अथवा काही काळ टिकणारा दृष्टिदोष निर्माण होऊ शकतो. डोळ्यांच्या बाहुल्यांना अथवा पडद्याला कायमची इजा होण्याचाही धोका असतो. पापण्यांच्या आतील भाग व डोळ्यांच्या भिंगाला इजा होऊ शकते. डोळ्याच्या मज्जातंतूंना इजा होऊन कायमचे अंधत्व येण्याचाही धोका असतो.

Web Title: mumbai news crackers Insomnia