लाचखोर प्राप्तिकर उपायुक्ताला अटक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

मुंबई - इन्कम टॅक्‍स असेसमेंटमध्ये मदत करण्याच्या नावाखाली एका व्यक्तीकडून तीन कोटी रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने शुक्रवारी आयकर भवनात सापळा रचून प्राप्तिकर उपायुक्त जयपाल स्वामी यांच्यासह तिघांना अटक केली. या प्रकरणी सीबीआयने मुंबईत तीन ठिकाणी छापेही टाकले. 

कमलेश शहा व प्रथमेश मास्डेकर अशी अटक करण्यात आलेल्या अन्य दोघांची नावे आहेत. दोन धनादेशांच्या स्वरूपात ही लाच देण्यात आली होती. तक्रारदाराकडून या तिघांनी सोन्याची मागणी केल्याचाही आरोप आहे. या तिघांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Web Title: mumbai news criem

टॅग्स