अभिनेत्रीला धमकी देणाऱ्यास अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 मार्च 2018

मुंबई - बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्रीला ठार मारण्याची धमकी देणाऱ्या मोहम्मद सर्फराज एहसानला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयाने 28 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तक्रारदार अंधेरी परिसरात राहतात. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले होते.

मोहम्मदने व्यावसायिक असल्याचे सांगून तक्रारदार अभिनेत्रीशी ओळख वाढविली. त्यानंतर त्याने म्हाडाच्या चार आणि सांताक्रूझमधील सदनिकेसाठी अभिनेत्रीकडून 15 कोटी 40 लाख 60 हजार घेतले. या पाचही सदनिकांचे बनावट दस्तावेज दाखवून अभिनेत्रीचा विश्‍वास संपादन केला; मात्र सदनिकेचे दस्तावेज बनावट असल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी विचारणा केल्यावर तो अभिनेत्रीला ठार मारण्याची धमकी देत होता. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी अभिनेत्रीच्या विनयभंगप्रकरणी मोहम्मदला जुहू पोलिसांनी अटक केली होती.

Web Title: mumbai news crime