नकार दिल्याने धमकावले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

मुंबई - ऑनलाइन विवाह नोंदणी संकेतस्थळाद्वारे संपर्कात आलेल्या तरुणाला विवाहास नकार दिल्याने त्याने तरुणीला शिवीगाळ करून धमकावण्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. विश्‍वास आचरेकर या तरुणाने आणि संबंधित तरुणीने संकेतस्थळावरील एकमेकांची माहिती पाहून भेट घेतली. भेटीनंतर मात्र तरुण आवडला नसल्यामुळे तिने लग्नास नकार दिला. त्यानंतर आरोपीने विविध कारणे आणि विविध क्रमांकांवरून तरुणीशी वारंवार संपर्क साधला आणि अनेकवेळा शिवीगाळ केली. त्यामुळे तरुणीने पोलिसांकडे तक्रार केल्यावर आरोपीला अटक करण्यात आली.
Web Title: mumbai news crime

टॅग्स