पोलिसांना धक्काबुक्‍की करणाऱ्या चौघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

मुंबई  - दारूच्या नशेत पोलिसाला धक्काबुक्‍की करणाऱ्या चौघांना पवई पोलिसांनी अटक केली आहे. अभिषेक पांडू शेट्टी, रिकी रॉबर्ट वाझ, किशोर मंजुनाथ पुजारी, सिद्धांत शिवाजी पवार (रा. चांदिवली परिसर) अशी त्या चार नशेबाजांची नावे आहेत. त्यांना अटक करून शुक्रवारी (ता. 30) न्यायालयात हजर करण्यात आले. चौघेही न्यायालयीन कोठडीत आहेत; तर दोन फरारींचा पवई पोलिस शोध घेत आहेत.

पवईच्या हेरिटेज गार्डनजवळ सहा जण दारूच्या नशेत आरडाओरड करत असल्याची माहिती पवई पोलिसांना गस्तीदरम्यान मिळाली. समज दिल्यावर त्यापैकी दोघे पोलिसाच्या अंगावर धावून गेले. पवई पोलिस ठाण्याची दोन गस्ती वाहने तेथे आल्यावर एकाने पोलिसाला धक्काबुक्‍की केली, तर एकाने पोलिसाला निलंबित करतो, अशी धमकी दिली.

कारवाईदरम्यान दोघे पळाले. या चौघांना पोलिस ठाण्यात आणल्यानंतरही ते पोलिसांशी हुज्जत घालत राहिले. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी चौघांना गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

Web Title: mumbai news crime 4 arrested