गांजा तस्करांना जोगेश्‍वरीतून अटक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 जून 2017

मुंबई - राज्यात गांजा तस्करीतील प्रमुख सूत्रधारांना तेलंगण पोलिसांच्या विशेष पथकाने रविवारी जोगेश्‍वरीतून अटक केली. मूर्ती रामय्या पिलई आणि अशोक माणिक म्हात्रे अशी त्यांची नावे आहेत. 

मुंबई - राज्यात गांजा तस्करीतील प्रमुख सूत्रधारांना तेलंगण पोलिसांच्या विशेष पथकाने रविवारी जोगेश्‍वरीतून अटक केली. मूर्ती रामय्या पिलई आणि अशोक माणिक म्हात्रे अशी त्यांची नावे आहेत. 

पिलई हा मूळचा तेलंगणाचा रहिवासी आहे, तर अशोक हा साकीनाका परिसरात राहतो. ते आंध्र प्रदेशमधील मोठ्या गांजा तस्करांच्या संपर्कात होते. तस्करीची वाहतूक व्यवस्था ते दोघे पाहत होते. तेलंगणातून येणारा गांजा ते मुंबई, नाशिक, पुणे, औरंगाबादमधील छोट्या तस्करांकडे देण्याचे काम करत होते. तेलंगणातील हयातनगर पोलिसांनी शुक्रवारी दोघा तस्करांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत मूर्ती आणि अशोकचे नाव समोर आले. त्यांना मूर्ती आणि अशोक मुंबईत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार जोगेश्‍वरी पोलिसांच्या मदतीने त्यांना ताब्यात घेतले. 

Web Title: mumbai news crime

टॅग्स