हुंडा मागणाऱ्या मुलाविरोधात तक्रार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

मानखुर्द - वरपक्षाकडून हुंड्यासाठी वाढता दबाव व मुलीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने त्रस्त झालेल्या मुलीच्या वडिलांनी मंगळवारी (ता.१५) मानखुर्द पोलिस ठाण्यात तक्रार केली. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. 

मानखुर्द येथील लल्लूभाई कम्पाऊंड वसाहतीत राहणाऱ्या गुप्ता कुटुंबातील मुलीचा विवाह मिरा रोड येथील श्‍यामजी गुप्ता यांचा मुलगा सूरज याच्याशी ठरला होता. २० फेब्रुवारीला या दोघांचा मिरा रोड येथील सेंट्रल प्लाझा हॉलमध्ये साखरपुडा झाला. साखपुड्यावेळी मुलीच्या पित्याने सोने-चांदीचे दागिने व रोख ११ हजार मुलाला भेट दिले होते. तसेच हॉलचा खर्चही त्यांनीच केला होता. साखरपुड्यावेळीच २५ नोव्हेंबर ही लग्नाची तारीख ठरवण्यात आली होती. त्यानंतर सूरजने मुलीकडे दूरध्वनी करून दोन लाख हुंडा व मोटरसायकल देण्याचा तगादा लावला. मुलीच्या वडिलांनी ही मागणी पूर्ण करण्यास असमर्थता दर्शवताच मुलीच्या चारित्र्याविषयी संशय घेण्यास सूरजने सुरुवात केली. त्यामुळे कंटाळलेल्या मुलीच्या वडिलांनी वरपक्षाविरोधात मानखुर्द पोलिस ठाण्यात मंगळवारी लेखी तक्रार केली. त्याची दखल घेत वरासह सासरच्या अन्य तिघांविरोधात फसवणूक व बदनामीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी मानखुर्द पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक संतोष चव्हाण चौकशी करत आहेत.

Web Title: mumbai news crime

टॅग्स