प्राप्तिकर उपायुक्तांच्या चालकाचा मोबाईल चोरणाऱ्या दोघांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

मुंबई - प्राप्तिकर उपायुक्तांच्या चालकाचा मोबाईल चोरल्याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी दोघांना अटक केली. दोन्ही आरोपींना तक्रारदाराने ओळखले असून त्यांनीही मोबाईल चोरल्याचे सांगितले आहे. रणजीत मंडल व मुख्तार अब्दुल माजिद शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. बोरिवली येथील रहिवासी असलेले तक्रारदार अविनाश भंडारी हे प्राप्तिकर उपायुक्तांकडे चालक म्हणून काम करतात. शनिवारी सकाळी प्राप्तिकर उपायुक्तांना प्राप्तिकर भवनात सोडल्यानंतर भंडारी हे गाडी पार्क करण्यासाठी एस. के. रोडवरील प्रतिष्ठा भवनासमोर आले. त्या वेळी दोन संशयित गाडी जवळ आले व त्यांनी मोबाईल हिसकावून पळ काढला.

मुंबई - प्राप्तिकर उपायुक्तांच्या चालकाचा मोबाईल चोरल्याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी दोघांना अटक केली. दोन्ही आरोपींना तक्रारदाराने ओळखले असून त्यांनीही मोबाईल चोरल्याचे सांगितले आहे. रणजीत मंडल व मुख्तार अब्दुल माजिद शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. बोरिवली येथील रहिवासी असलेले तक्रारदार अविनाश भंडारी हे प्राप्तिकर उपायुक्तांकडे चालक म्हणून काम करतात. शनिवारी सकाळी प्राप्तिकर उपायुक्तांना प्राप्तिकर भवनात सोडल्यानंतर भंडारी हे गाडी पार्क करण्यासाठी एस. के. रोडवरील प्रतिष्ठा भवनासमोर आले. त्या वेळी दोन संशयित गाडी जवळ आले व त्यांनी मोबाईल हिसकावून पळ काढला. त्यानंतर भंडारी यांनी तत्काळ याबाबतची तक्रार आझाद मैदान पोलिसांकडे केली. त्यानंतर काही तासांतच आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले.

Web Title: mumbai news crime