मुंबईत सट्टेबाजीप्रकरणी अभिनेत्याच्या मेव्हण्याला अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

मुंबई - 24 ऑगस्टला भारत-श्रीलंकादरम्यान झालेल्या सामन्यातील सट्टेबाजीप्रकरणी एका बॉलिवूड अभिनेत्याच्या मेव्हण्याला मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. पोलिस सट्टेबाजांच्या गेल्या महिनाभरापासून मागावर होते. ठाणे व मुंबईमध्ये पोलिसांनी काही सट्टेबाजांना अटक केली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी अमित अजित गिल याला अटक केली. या प्रकरणी गिलला 3 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नुकतीच दीपक कपूर या बड्या बुकीसह तरुण ठाकूर, सनी ठाकूर, नीतेश खेतलाजी, निखिल गणात्रा व आशिष शर्मा या सहा जणांना यापूर्वी अटक केली होती. त्यांच्याकडून पोलिसांनी 13 मोबाईल फोन, 2 लॅपटॉप व एक डायरी जप्त केली होती.

Web Title: mumbai news crime