लग्नास नकार दिल्याने नियोजित पतीचे तरुणीवर वार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

मुंबई - साखरपुडा झाल्यानंतर लग्नाला नकार दिल्याने वसईतील एका तरुणीवर तिच्या नियोजित पतीने अंधेरीत प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पळून गेलेल्या हल्लेखोराचा पोलिस शोध घेत आहेत. वसईतील या तरुणीचा साखरपुडा झाल्यानंतर आपल्या नियोजित पतीची वर्तणूक वाईट असल्याचे तिच्या निदर्शनास आल्यानंतर तिने लग्नाला नकार दिला होता. तिच्या नकारामुळे संतप्त झालेल्या आरोपीने तिला अंधेरी परिसरात बोलावले आणि तिच्यावर चाकूने वार केले. हल्ल्याची माहिती मिळताच अंधेरी पोलिस घटनास्थळी आले. त्यांनी तरुणीला रुग्णालयात दाखल केले.

मुंबई - साखरपुडा झाल्यानंतर लग्नाला नकार दिल्याने वसईतील एका तरुणीवर तिच्या नियोजित पतीने अंधेरीत प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पळून गेलेल्या हल्लेखोराचा पोलिस शोध घेत आहेत. वसईतील या तरुणीचा साखरपुडा झाल्यानंतर आपल्या नियोजित पतीची वर्तणूक वाईट असल्याचे तिच्या निदर्शनास आल्यानंतर तिने लग्नाला नकार दिला होता. तिच्या नकारामुळे संतप्त झालेल्या आरोपीने तिला अंधेरी परिसरात बोलावले आणि तिच्यावर चाकूने वार केले. हल्ल्याची माहिती मिळताच अंधेरी पोलिस घटनास्थळी आले. त्यांनी तरुणीला रुग्णालयात दाखल केले. तिच्या गळ्यावर आणि पोटावर गंभीर जखमा झाल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Web Title: mumbai news crime