प्रेयसीवर चाकूहल्ला करणाऱ्याला अटक

प्रेयसीवर चाकूहल्ला करणाऱ्याला अटक

मुंबई - लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीवर चाकूने हल्ला करून पळून गेलेल्या तरुणाला अंधेरी पोलिसांनी गजाआड केले आहे. सई मोहम्मद यार मोहम्मद पठाण असे त्याचे नाव आहे. तो लखनौमध्ये सापडला. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

सई हा मूळचा लखनौमधील रहिवासी आहे. त्याची काही वर्षांपूर्वी एका तरुणीशी ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले होते. काही महिन्यांपूर्वीच नोकरीच्या शोधात सई हा मुंबईला आला होता. उपनगरांतील एका बांधकामाच्या ठिकाणी तो काम करत होता. त्याने या तरुणीसोबत लग्न करण्याचे ठरवले होते. मात्र त्यांच्यात काही कारणांमुळे नेहमी खटके उडत होते. सप्टेंबरमध्ये ही तरुणी लखनौ येथून मुंबईला आली. वसई येथील एका मैत्रिणीकडे ती राहत होती. ती मुंबईला आल्याचे सईला समजले. त्याने तिला अंधेरीतील एका हॉटेलमध्ये भेटण्याकरता बोलावले. तिथे त्याने तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. जखमी झालेल्या तरुणीला पोलिसांनी शीव येथील टिळक रुग्णालयात दाखल केले आहे. 

पोलिसांना तांत्रिक माहितीनुसार सई हा लखनौमध्ये असल्याची माहिती मिळाली. दोन दिवसांपूर्वी पोलिसांचे पथक लखनौला गेले. तेथून त्याला ताब्यात घेण्यात आले. अटक करून गुरुवारी न्यायालयात हजर केल्यावर चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com