जोगेश्वरीमध्ये शौचालयात आढळला पुरुषाचा मृतदेह

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 जून 2017

या प्रकरणी अपमृत्यूची नोंद करून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

मुंबई : जोगेश्वरी पूर्वच्या शौचालयात कुजलेल्या अवस्थेत एका पुरुषाचा मृतदेह सोमवारी रात्री आढळून आला.

मनीष मुछोया असं त्या मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याने तीन-चार दिवसांपूर्वी गळफास लावून आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. आत्महत्येचे नेमके कारण व इतर तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही. 

या मृत्यूची खबर मिळाल्यावर मेघवाडी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणी अपमृत्यूची नोंद करून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. 
 

Web Title: mumbai news crime news jogeshwari death suicide