घरफोडीप्रकरणी एकाला अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 मार्च 2018

मुंबई - गिरगाव परिसरात 70 लाखांची घरफोडी करणाऱ्यास एलटी मार्ग पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. इंद्रसेन गायाप्रसाद चौरसिया असे आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला 2 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तक्रारदार हे सोने व्यापारी असून, ते गिरगाव परिसरात राहतात. एप्रिल 2017 मध्ये ते धार्मिक कार्यक्रमानिमित्त कुटुंबासह सुरतला गेले होते. त्या वेळी चोरट्यांनी त्यांच्या घरातून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा 70 लाखांचा ऐवज लांबवला होता. याप्रकरणी बुधवारी (ता. 28) इंद्रसेनला पोलिसांनी ताब्यात घेतले.
Web Title: mumbai news crime one arrested in theft case