अभिनेता ऋषी कपूर विरोधात गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 जून 2017

मुंबई - बंगल्यासमोरील झाडे तोडल्याप्रकरणी अभिनेता ऋषी कपूर यांच्या विरोधात महापालिकेने खार पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. त्याची दखल घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई - बंगल्यासमोरील झाडे तोडल्याप्रकरणी अभिनेता ऋषी कपूर यांच्या विरोधात महापालिकेने खार पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. त्याची दखल घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

वांद्रे येथील पाली हिल परिसरात ऋषी कपूर यांचा "कृष्णराज' बंगला आहे. या बंगल्याजवळ बांधकाम करण्यासाठी त्याने झाडे तोडल्याचा आरोप आहे. झाडाच्या फांद्या तोडण्याची त्याने पालिकेकडून परवानगी घेतली होती; परंतु नियमांचे उल्लंघन करून त्याने झाडे तोडली. या प्रकरणी पालिकेने नोटीस पाठवून एका दिवसात उत्तर देण्यास सांगितले होते. त्याबाबत त्याने कोणताही प्रतिसाद दिला नव्हता.

Web Title: mumbai news crime on rushi kapoor