संजय निरुपम यांच्यावर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

मुंबई - विनापरवानगी सभा घेऊन प्रक्षोभक भाषण केल्याने मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्याविरोधात मालाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली.

विविध रेल्वे स्थानकांजवळील फेरीवाल्यांविरोधात मनसेने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. फेरीवाल्यांना होणाऱ्या मारहाणीविरोधात शनिवारी (ता. 28) मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी मालाड स्थानकाबाहेर सभा घेतली. विनापरवानगी सभा घेत चिथावणीखोर भाषण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. निरुपम यांनी फेरीवाल्यांना चिथावल्याचा आरोप मनसेने केला असून, चिथावणीखोर भाषण आणि विनापरवाना सभा घेतल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

काही दिवसांपूर्वीच मालाड पश्‍चिम येथील अतिक्रमणांवर पालिकेने कारवाई केली होती. कारवाईनंतर फेरीवाले स्थानक परिसरात बसतात का हे पाहण्याकरता शनिवारी माळवदे गेले होते. तेव्हा आक्रमक झालेल्या फेरीवाल्यांनी माळवदे यांना मारहाण केली.

Web Title: mumbai news crime on sanjay nirupam