करी रोड रेल्वे स्थानकाची निरुपम यांनी केली पाहणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

भायखळा - एल्फिन्स्टन रोड दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांनी बुधवारी (ता. १८) करी रोड रेल्वे पुलाची पाहणी केली. या वेळी त्यांनी प्रवाशांना सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन केले.

भायखळा - एल्फिन्स्टन रोड दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांनी बुधवारी (ता. १८) करी रोड रेल्वे पुलाची पाहणी केली. या वेळी त्यांनी प्रवाशांना सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन केले.

निरुपम हे मुंबईतील एकूण १४ रेल्वे स्थानके व तेथील रेल्वे पादचारी पुलांची पाहणी करणार आहेत. त्याची सुरुवात त्यांनी बुधवारी करी रोड रेल्वे स्थानकापासून केली. त्या वेळी काँग्रेसचे वरिष्ठ नेते एकनाथ गायकवाड, काँग्रेस विभाग अध्यक्ष दत्तू गवाणकर व अनेक काँग्रेस नेते उपस्थित होते. पक्षाच्या नेत्यांनी या पुलाच्या दुरुस्तीबाबत अनेकदा रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती; मात्र रेल्वेने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे त्यांनी सांगितले. १९६४ पासून हा पूल मोठा करण्याची मागणी होत आहे. एल्फिन्स्टनच्या पुलापेक्षा हा पूल अरुंद आहे. त्यामुळे येथे सरकते जिने बांधण्याची मागणीही त्यांनी केली. लोअर परळ, वरळी भागात मोठ्या प्रमाणात कंपन्यांची कार्यालये आहेत. परिणामी, या रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे येथील पूल रुंद करण्याची गरज आहे. 

फलाटाच्या मध्यावरील पादचारी पुलाचे काम खूप संथगतीने सुरू आहे. तसेच त्याचा उपयोग फारसा होणार नसेल, तर दिखाव्यासाठी हा पूल बांधत असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.

Web Title: mumbai news Curry Road Railway Station