लोकरीच्या आकाशकंदिलांची दादरमध्ये झळाळी!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

दादर - दिवाळीनिमित्त दादरचा बाजार फुलून गेला आहे. यंदा या बाजारात लोकरीच्या कपड्यांपासून तयार करण्यात आलेल्या आकाशकंदिलांची चलती आहे. 

सात वर्षांपासून मुलुंडमध्ये वक्रतुंड आर्टस्‌चे लोकरीच्या कपड्यापासून तयार करण्यात आलेले कंदील विक्रीसाठी ठेवले जातात. तीन वर्षांपासून दादरच्या मार्केटमध्येही त्यांची विक्री केली जात आहे.

दादर - दिवाळीनिमित्त दादरचा बाजार फुलून गेला आहे. यंदा या बाजारात लोकरीच्या कपड्यांपासून तयार करण्यात आलेल्या आकाशकंदिलांची चलती आहे. 

सात वर्षांपासून मुलुंडमध्ये वक्रतुंड आर्टस्‌चे लोकरीच्या कपड्यापासून तयार करण्यात आलेले कंदील विक्रीसाठी ठेवले जातात. तीन वर्षांपासून दादरच्या मार्केटमध्येही त्यांची विक्री केली जात आहे.

यंदा वक्रतुंड आर्टस्‌तर्फे सहा हजारांहून अधिक कंदील विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. त्यांच्या किमती शंभरपासून दीड हजार रुपयांपर्यंत आहेत. जे. जे. स्कूल ऑफ आर्टचा विद्यार्थी विघ्नेश जांगळी याच्या मार्गदर्शनाखाली काही कारागीर, महिला बचत गटाच्या सदस्या आणि विशेष मुलांनीही कंदील बनवले आहेत. कॉलेजमध्ये शिकत शिकत विघ्नेश कंदील बनवितो. दर वर्षी कंदिलाच्या दहा-बारा डिझाईन बाजारात आणण्याचा त्याचा प्रयत्न असतो. कपड्यापासून तयार केल्यामुळे कंदील टिकाऊ असतात. त्याचा पुन्हा वापर करता येऊ शकतो, असे तो म्हणतो. परदेशातील वा अन्य राज्यातील आपल्या नातेवाईकांना ‘वक्रतुंड आर्टस्‌’चे अनोखे कंदील पाठवणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. 

मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांच्या घरची दिवाळी ‘वक्रतुंड’च्या कंदिलांना उजळून निघते. दादरच्या स्वामी समर्थांच्या मठात आणि प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरातही विघ्नेशचे कंदील लावले जातात. वर्षभर सजावटीसाठीही अनेक हॉटेल वा हॉलमध्ये लोकरीचे कंदील लावले जातात. वक्रतुंड आर्टस्‌ने काही कंदील बनविण्याची संधी मुंबईतील महिला बचत गटांना दिली होती. त्यानुसार अनेक महिला बचत गटांनी यंदा वक्रतुंड आर्टस्‌चे काही कंदील तयार केले. 

विशेष विद्यार्थ्यांची कला
यंदाच्या दिवाळीसाठी सात महिन्यांपासून ‘वक्रतुंड’चे कंदील बनविण्याचे काम सुरू आहे. ठाण्यातील जागृती पालक संस्थेत विशेष मुलांसोबत कार्यशाळा घेऊन विघ्नेश जांगळी याने त्यांना शंभर कंदील बनविण्याची संधी दिली. स्वतःकडे पन्नासहून अधिक कामगार असतानाही विशेष विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्याचा प्रयत्न यंदा विघ्नेशने केला. 

स्वदेशीचा स्वीकार...
स्वदेशीचा स्वीकार अन्‌ चिनी वस्तूंवर बहिष्कार असा निर्धार करून विघ्नेश जांगळी याने भारतीय बनावटीचे इकोफ्रेंडली कंदील बनविले आहेत. ‘से नो टू चायना’ असे म्हणत यंदा कंदिलाच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. चिनी कंदिलाच्या तोडीस तोड पारंपरिक कंदील बनविण्याचा आपला प्रयत्न आहे, असे विघ्नेश सांगतो.

Web Title: mumbai news dadar diwali festival

टॅग्स