दहीहंडीच्या बक्षिसांना उतरती कळा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

मुंबई - दहीहंडी दोन दिवसांवर येऊन ठेपली असतानाही यंदा आयोजकांमध्ये निरुत्साह आहे. कोट्यवधीची बक्षिसे म्हणजे थरांचा थरार हे समीकरण बिघडल्याचे चित्र दिसते आहे. काही मंडळांनी हा उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे, तर काहीनी तो साधेपणाने साजरा करणार असल्याचे म्हटले आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील यंदाचा दहीहंडी उत्सव रद्द केला आहे. मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सचिन अहिर मोठ्या प्रमाणात दहीहंडी उत्सव साजरा करतात; मात्र यंदा पक्षाच्या वतीनेच दहीहंडी साजरी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

ठाण्यातील शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानच्यावतीने प्रथम नऊ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास एक लाख, तर दुसऱ्यावेळी नऊ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास 50 हजार रुपये, आठ थरांसाठी 25 हजार रुपये, सात थरांसाठी 10 हजार आणि सहा थरांसाठी 5 हजारांचे पारितोषिक जाहीर केले आहे. दहीहंडी उत्सवात सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल, असे सरनाईक यांनी सांगितले. 

ठाण्यात मनसेने नऊ थर लावून हंडी फोडणाऱ्या पथकास 11 लाखांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे. मुंबई आणि परिसरात सध्या जाहीर केलेल्या दहीहंडीपैकी सर्वाधिक बक्षीस असलेली ही एकमेव हंडी आहे. 

तीन वर्षांपूर्वी ज्याप्रमाणे दहीहंडी साजरी केली जात होती, त्याचप्रमाणे यंदाही केली जाणार असल्याचे भाजपचे राम कदम यांनी सांगितले. आपल्या उत्सवात सेलिब्रिटी सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले; परंतु बक्षिसांची रक्कम मात्र गुलदस्त्यात ठेवली. रवींद्र फाटक यांनीही यंदा दहीहंडी उत्सवात स्पर्धा नसेल, असे जाहीर केले आहे. 

आयोजनासाठी कमी वेळ 
न्यायालयाने दहीहंडीवर निर्बंध घातल्यामुळे तीन वर्षांपासून फारसा उत्साह दिसत नव्हता; मात्र यंदा न्यायालयाने निर्बंध उठवल्याने मुंबई आणि परिसरात दहीहंडीचा उत्सव जोरदार होईल. लाखोंच्या बक्षिसांसाठी थरांचा थरार अनुभवायला मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु न्यायालयाचा निर्णय उशिरा आल्याने आयोजनासाठी पुरेसा वेळ न मिळाल्याने यंदा निरुत्साह जाणवत असल्याचे काहींनी सांगितले. 

Web Title: mumbai news dahihandi