धारावीत प्रार्थनास्थळांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

धारावी - उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पालिकेने शहरातील बेकायदा प्रार्थनास्थळांवर कारवाई सुरू केली आहे. चारकोपमधील तीन मंदिरांवर कारवाई केल्यानंतर गुरुवारी (ता. २०) पालिकेने धारावी कोळीवाडा येथील साईबाबा मंदिर व गोपीनाथ कॉलनीतील सेक्रेट हार्ट चॅपल चर्चवर कारवाई केली. 

पालिकेने धारावीतील अनेक प्रार्थनास्थळांना कारवाईच्या नोटिसा दिल्या होत्या. त्यानुसार गुरुवारी धारावीतील या दोन प्रार्थनास्थळांवर कारवाई करण्यात आली. या वेळी विभागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते; मात्र पालिका अधिकाऱ्यांनी स्थानिकांशी चर्चा केली. त्यानंतर स्थानिकांनी स्वत: प्रार्थनास्थळ स्वतः हटविण्याची भूमिका घेत मंदिर व चर्च पाडण्यात आले. यापूर्वी धारावीतील ९० फुटी रस्त्यावरील शिवशंकर नगर येथील संकल्पना इमारतीसमोरील साईबाबा मंदिर पालिकेने तोडले होते.

Web Title: mumbai news Dharavi encroachment