विद्यापीठाच्या कारभाराला कंटाळून संचालकांची स्वेच्छानिवृत्ती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

मुंबई - मुंबई विद्यापीठातील गोंधळामुळे "मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्‍स अँड पब्लिक पॉलिसी' विभागाचे संचालक डॉ. नीरज हातेकर यांनी स्वेच्छानिवृत्ती घेण्याचे ठरविले आहे. फेसबुकवर त्यांनी ही घोषणा केली.

मुंबई - मुंबई विद्यापीठातील गोंधळामुळे "मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्‍स अँड पब्लिक पॉलिसी' विभागाचे संचालक डॉ. नीरज हातेकर यांनी स्वेच्छानिवृत्ती घेण्याचे ठरविले आहे. फेसबुकवर त्यांनी ही घोषणा केली.

'मुंबई विद्यापीठाचा कारभार खूप त्रासदायक आहे. आता संयमाचा अंत झाला आहे. त्यामुळे मी स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई विद्यापीठासाठी मी बाहेरून काम करीन; पण प्रशासनाचा भाग बनून काम करणे मला कठीण आहे,'' असे हातेकर यांनी म्हटले आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वीच परीक्षा व मूल्यमापन विभागाचे विशेष कार्य अधिकारी विनायक दळवी यांच्यावर फेसबुक पोस्टवरून टीका केली होती. प्रश्‍नपत्रिका तपासण्यासाठी दळवी प्राध्यापकांना त्रास देतात, असा आरोप त्यांनी केला होता; परंतु दुसऱ्याच दिवशी हातेकर यांनी याबाबत जाहीर माफी मागितली.
प्राध्यापकांच्या अडचणींबद्दल मला वृत्तपत्रांतून माहिती मिळाली. सत्य परिस्थितीची मी खातरजमा करायला हवी होती, असे स्पष्टीकरणही हातेकर यांनी दिले होते. या संपूर्ण प्रकरणाबाबत विनायक दळवी यांच्याशी चर्चाही केल्याचे त्यांनी सांगितले होते; परंतु सोमवारी पुन्हा फेसबुक पोस्टवरून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती जाहीर केली.

Web Title: mumbai news director vrs by university work issue