डिझायनर रांगोळ्या जपताहेत दिवाळीची संस्कृती

डिझायनर रांगोळ्या जपताहेत दिवाळीची संस्कृती

दादर - रांगोळीला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोणताही सण रांगोळीशिवाय साजरा होतच नाही. मंगलप्रसंगी विविध रंगारूपातली रांगोळी लक्ष वेधून घेते. पूर्वी गावात गाईच्या शेणाने सडा घालून सुवासिनी रांगोळी काढत असत. पूर्वी शहरातल्या गृहिणी किमान दिवाळीत गेरू लावून त्यावर ठिपक्‍यांची लहानशी रांगोळी काढून संस्कृती जपताना दिसायच्या... पण आताच्या तंत्रज्ञानाच्या युगात व्यस्त झालेल्या महिलांना डिझायनर रांगोळ्या आपल्याशा वाटू लागल्या आहेत. 

मनमोहक डिझायनर रांगोळ्या बाजारातही मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. ५० रुपयांपासून ते हजार रुपयांपर्यंत मिळत असलेल्या रेडी टू यूझ रांगोळ्यांना गृहिणींचीही चांगलीच पसंती मिळत आहे.

ताटाभोवती असणाऱ्या आणि उंबरठ्याची शान वाढवणाऱ्या डिझायनर रांगोळीत विविध रंगसंगती पाहायला मिळतात. गेल्या दोन-तीन वर्षांत सुशोभीकरणाच्या वस्तूंमध्येही डिझायनर रांगोळ्यांना विशेष महत्त्व आले आहे. डिझायनर रांगोळ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे एक सेट खरेदी केल्यानंतर त्याची रचना किमान दोन पद्धतींच्या डिझाईनमध्ये करता येते. वापरून झाल्यानंतर त्या व्यवस्थित पॅक करून ठेवल्या की पुन्हा वापरत्या येतात. 

विशेष पणत्यांची रचना असलेल्या रांगोळ्यांना सध्या मागणी आहे. मोर कमळ, विविध फुले, कोयरी, स्वस्तिक आदी विविध नक्ष्या त्यात उपलब्ध आहेत. अशा रांगोळ्यांमुळे घरगुती विणकाम आणि सुशोभीकरणाच्या वस्तू तयार करणाऱ्या महिलांना एक रोजगार निर्माण झाला आहे. अशा रांगोळ्या फक्त नेहमीच्या बाजारपेठेतच नव्हे, तर महाराष्ट्र व्यापारी पेठ आणि दिवाळीदरम्यान लागणाऱ्या सर्वच प्रदर्शनांमध्ये पाहायला मिळतात.

यंदा मोहाडीकर आणि न्यूज वेव्ह पैठणी फेस्टिव्हलमध्ये डिझायनर रांगोळीचे स्टॉल लावणाऱ्या विलेपार्लेच्या हर्षदा जोशी सांगतात, ‘गेल्या दोन वर्षांत डिझायनर रांगोळ्यांना महत्त्व आले आहे. आमच्या सर्व वस्तू हॅण्डमेड असतात. रांगोळ्यांच्या किमती ५० रुपयांपासून हजारापर्यंत आहेत. नोकरी-व्यवसाय करणाऱ्या गृहिणींसाठी तो उत्तम पर्याय आहे. कमी वेळात रांगोळी सजवून होत असल्याने त्यांचे महत्त्व वाढले आहे.

रांगोळीचे वैशिष्ट्य
डिझायनर रांगोळीचे सेट मिळतात. आलटून पालटून गरजेनुसार ते वापरता येतात. बाजूने पणत्या ठेवल्यास रांगोळी अधिकच आकर्षक दिसते. दरवाजात एक वेगळीच रोषणाई येते. रेडी टू यूज असल्याने त्यांना वेगळेच महत्त्व आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com