डॉक्‍टरांना नोंदणीसाठी आधार क्रमांक सक्तीचा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

मुंबई - डॉक्‍टरांच्या नोंदणीसाठी आधार कार्ड सक्तीचे करण्यात आल्याची सूचना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने काढली आहे. बोगस डॉक्‍टरांना आळा घालण्यासाठी ही क्‍लृप्ती योजण्यात आल्याचे सांगण्यात येते. 1965च्या महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल कायद्यांतर्गत नावनोंदणी करायची असल्यास डॉक्‍टरांना आधार क्रमांक सक्तीचे करण्यात आले आहे. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियानेच हा निर्णय जाहीर केला आहे. जुलै 2017मध्ये देशभरातील डॉक्‍टरांना आधार नोंदणीबाबत पत्रे पाठविण्यात आली होती. डिजिटल मिशन मोड प्रोजेक्‍टअतंर्गत इंडियन मेडिकल रजिस्ट्रेशन आणि युनिक पर्मनंट रजिस्ट्रेशनअंतर्गत नोंदणीसाठी आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे.

मुंबई - डॉक्‍टरांच्या नोंदणीसाठी आधार कार्ड सक्तीचे करण्यात आल्याची सूचना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने काढली आहे. बोगस डॉक्‍टरांना आळा घालण्यासाठी ही क्‍लृप्ती योजण्यात आल्याचे सांगण्यात येते. 1965च्या महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल कायद्यांतर्गत नावनोंदणी करायची असल्यास डॉक्‍टरांना आधार क्रमांक सक्तीचे करण्यात आले आहे. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियानेच हा निर्णय जाहीर केला आहे. जुलै 2017मध्ये देशभरातील डॉक्‍टरांना आधार नोंदणीबाबत पत्रे पाठविण्यात आली होती. डिजिटल मिशन मोड प्रोजेक्‍टअतंर्गत इंडियन मेडिकल रजिस्ट्रेशन आणि युनिक पर्मनंट रजिस्ट्रेशनअंतर्गत नोंदणीसाठी आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या वेबसाइटवरही आधार कार्डाची सेल्फ अटेस्टेड कॉपी द्यावी लागणार आहे. 

Web Title: mumbai news doctor aadhar card