पायाला छिद्र पाडून नळीच्या साहाय्याने PDA यंत्र बसवलं हृदयात; हृदयविकाराच्या दुर्मिळ आजारावर यशस्वी सर्जरी

पायाला छिद्र पाडून नळीच्या साहाय्याने PDA यंत्र बसवलं हृदयात; हृदयविकाराच्या दुर्मिळ आजारावर यशस्वी सर्जरी

मुंबई, 10 : 11 वर्षीय मुलीवर जन्मजात हृदयविकाराच्या दुर्मिळ आजारावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात डाॅक्टरांना आले आहे. परभणीत रोंजंदारीवर काम करणाऱ्या बिरमोळे कुटुंबातील 11 वर्षाच्या मुलीला ( सुप्रिया नाव बदललेले आहे )  नेरुळच्या तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटरयेथे जीवदान मिळाले आहे. सुप्रियाला जन्मजात हृदयविकार असल्यामुळे तिची हालचाल फारच कमी होती. जास्त चालल्यावर अथवा काम केल्यावर तिला थकवा लागत होता. सुप्रिया हिच्या घरातील परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे तिच्या आजारावर  कोणतेही ठोस उपचार झाले नव्हते , गेल्या सहा महिन्यापासून तिची प्रकृती खालावत गेल्यामुळे बिरमोळे कुटुंबातील नातेवाईकांनी तिला नेरुळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टर येथे भरती केले. 

तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलचे बालहृदयविकार शल्यचिकित्सक डॉ भूषण चव्हाण यांनी सांगितले, " हृदयामधून निघणाऱ्या दोन्ही रक्त वाहिन्यांना जोडणारी एक रक्तवाहिनी असते. ही रक्तवाहिनी आईच्या पोटात असताना प्रत्येक अर्भकामध्ये असते, पण जन्म झाल्यानंतर ती बंद होते. ती बंद न झाल्यास उध्दभवणाऱ्या आजाराला पेटेंट डक्टस आरटेरिव्होससपेटेंट डक्टस आरटेरिव्होसस (PDA ) असे म्हणतात. सुप्रियाच्या वयाचा विचार करता आम्ही ओपन हार्ट सर्जरी न करता डिव्हाइस प्रोसिजर करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये जांघेमधून एक कॅथेटर हृदयाच्या आतपर्यंत पोहोचवण्यात येते व त्या कॅथेटरमार्फत एक छत्रीवजा डिव्हाइसने पीडीए बंद करण्यात येते. या डिव्हाइस प्रोसिजरसाठी अत्याधुनिक कॅथ लॅब यंत्रणेच्या मदतीने तिच्या पायाला छिद्र पाडून एक लांब नळीच्या साहाय्याने  पीडीए डिव्हाइस हृदयात बसवण्यात आले.

जन्मजात हृदयरोग असूनही अकराव्या वर्षी सर्जरी करणे कठीण होते.  एका ठरावीक वयानंतर शल्यचिकित्सा करणे कठीण जाते. या केसमध्ये पीडीएची साईज एक सेंटीमीटर होती व ही स्थिती फारच दुर्मिळ असते. पण, सुप्रियाच्या फुफुसांची स्थिती सकारात्मक असल्यामुळे आम्हाला ही शस्त्रक्रिया करणे शक्य झाले. आता सुप्रियाची तब्येत सुधारली आहे. 

सुप्रियाची तब्येत खराब असल्यामुळे तिला शाळेत जाण्यासाठी खूप अडचणी येत होत्या परंतु आता ती नियमित शाळेत जाऊ शकेल. ही शल्यचिकित्सा महात्मा ज्योतिबा फुले जन स्वास्थ्य योजनेअंतर्गत करण्यात आली आहे.

mumbai news doctors have successfully operated 11 year old girl for a rare congenital heart disease

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com