भटक्‍या कुत्र्यांची नसबंदी अयोग्य प्रकारे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

मुंबई - नसबंदी करूनही भटक्‍या कुत्र्यांची संख्या वाढत असल्याने नसबंदी योग्य प्रकारे होत नसल्याचा आरोप मंगळवारी महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आला. २०१४ मध्ये मुंबईत ९५ हजार १७२ भटकी कुत्री होती. आता एक लाख दोन हजार ३७९ कुत्री असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. त्यावर भटक्‍या कुत्र्यांवर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात येईल, असे प्रशासनाने सांगितले. 

भटक्‍या कुत्र्यांच्या उपद्रवाबाबत स्थायी समितीत मंगळवारी चर्चा करण्यात आली. नियमानुसार शहरातील ३० टक्के कुत्र्यांचे निर्बीजीकरण करणे बंधनकारक आहे. मात्र ते होत असतानाही प्रत्येक विभागात कुत्र्यांची संख्या वाढली असल्याचा आरोप शिवसेनेचे नगरसेवक संजय घाडी यांनी केला. त्यावर सर्व पक्षांच्या नगरसेवकांनी नसबंदी योग्य प्रकारे होत नसून त्याची संपूर्ण माहिती स्थायी समितीपुढे सादर करावी, अशी मागणी केली. मुंबईमध्ये २०१४ मध्ये ९५ हजार १७२ भटकी कुत्री होती. नसबंदी योग्य प्रकारे होत नसल्याने यामध्ये तीन वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मुंबईच्या विविध ठिकाणी असलेल्या भटक्या कुत्र्यांची संख्या एक लाख दोन हजार ३७९ इतकी झाली आहे.

भटक्‍या कुत्र्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची परवानगी द्यावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात येईल, असे आश्‍वासन अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी दिले. 

पाळीव कुत्र्यांविषयी धोरणाची मागणी
कुत्री पाळण्यासाठी महापालिका परवाना देते. या पाळीव प्राण्यांना नैसर्गिक विधीसाठी रस्त्यावर आणले जाते. त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती असते. त्यांच्यासाठी धोरण ठरवावे, अशी मागणी शिक्षण समितीच्या अध्यक्ष शुभदा गुडेकर यांनी केली.

मांजरांची नसबंदी अशक्‍य
मांजरांची संख्याही प्रचंड वाढली आहे. त्यांचाही नागरिकांना त्रास होत आहे. हा उपद्रव थांबवण्यासाठी त्यांचेही निर्बीजीकरण करा, अशी मागणी शिवसेनेच्या राजुल पटेल यांनी केली; मात्र मांजरांचे निर्बीजीकरण करता येत नाही, असे प्रशासनाने सांगितले.

Web Title: mumbai news dog