Republic Day 2021: डोंबिवलीत दिमाखात फडकला 150 फूट उंचीचा राष्ट्रध्वज

शर्मिला वाळुंज
Tuesday, 26 January 2021

देशभक्तीपर वातावरणात डोंबिवली पूर्वेमध्ये 150 फूट उंचीचा राष्ट्रध्वज दिमाखात फडकला.

मुंबई: लेझीम ताशाचा गजर, नागरिकांचा भारत माता की जय...वंदे मातरमचा नारा... अशा देशभक्तीपर वातावरणात डोंबिवली पूर्वेमध्ये 150 फूट उंचीचा राष्ट्रध्वज दिमाखात फडकला. येथील दत्तनगर चौकात प्रजासत्ताक दिनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते ध्वजाचे अनावरण करण्यात आले. 

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर चौकात माजी नगरसेवक राजेश मोरे आणि माजी नगरसेविका भारती मोरे यांच्या प्रयत्नातून 150 फूट उंचीचा राष्ट्रध्वज उभारण्यात आला आहे. यानिमित्ताने दत्तनगर, संगीतावाडी आणि मढवी स्कूल प्रभागात आकर्षक विद्युत रोषणाई करत परिसर झगमगून टाकण्यात आला आहे. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

डोंबिवलीत प्रथमच अशी रोषणाई करण्यात आल्याने नागरिक ते पाहण्यासाठी रात्रीच्या वेळेस गर्दी करीत आहेत. राष्ट्रध्वजाच्या शेजारीच राष्ट्रपुरुषांची अत्यंत सुंदर अशी शिल्प आहेत. येथे सेल्फी काढण्यासाठी प्रत्येक डोंबिवलीकर गर्दी करीत आहेत. प्रत्येक डोंबिवलीकरांच्या मनातील जाज्वल्य राष्ट्रभक्तीची भावना आणखीन बळकट होण्याच्या उद्देशाने आपण ही राष्ट्रध्वजाची संकल्पना मांडल्याचेही राजेश मोरे यांनी यावेळी सांगितले.

या अनावरणाच्यावेळी कल्याण डोंबिवली पालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, कल्याण परिमंडळ 3 चे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे, माजी महापौर विनिता राणे, गोपाळ लांडगे, दीपेश म्हात्रे, राजेश मोरे, भारती मोरे, भाजपचे नगरसेवक नितीन पाटील आणि मंदार हळबे उपस्थित होते. 

हेही वाचा- Mumbai Cold Weather: माथेरानपेक्षा मुंबईतील पारा खाली

----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai news Dombivli Republic Day 150 feet high national flag hoisted


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai news Dombivli Republic Day 150 feet high national flag hoisted