मुंबईकरांनो लॉकडाउनचं टेन्शन घेऊ नका, फक्त 'चलता हैं अ‍ॅटिट्यूड सोडा'

rajesh-tope.jpg
rajesh-tope.jpg

कोरोना रुग्णांच्या रोजच्या वाढत्या संख्येमुळे राज्यात पुन्हा एकदा नव्याने निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या नव्या निर्बंधांमध्ये कार्यालयीन उपस्थितीवर बंधनं घालण्यात आली आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबद्दलही सरकार कठोर निर्णय घेणार? अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे. मुंबईकरांच्या मनात लॉकडाउनची भीती आहे. कारण कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मागच्यावर्षी कठोर लॉकडाउन लावण्यात आला होता. त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागला. त्यामुळे लॉकडाउन नको रे बाबा अशी नागरिकांनी भावना आहे. 

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आज केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना भेटण्यासाठी दिल्लीत गेले आहेत. तिथे माध्यमांशी बोलताना त्यांनी नागरिकांना दिलासा देणारे वक्तव्य केले. "कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण संख्या वाढली आहे. पण ८५ ते ९० टक्के रुग्ण पॉझिटिव्ह ठरुनही त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत. राज्याचा रिकव्हरी रेट ९० ते ९५ टक्के चांगला आहे. फक्त संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. राज्यात डॉक्टर, बेडस उपलब्ध आहेत. मृत्यूदर पॉईट ५ टक्के आहे. त्यामुळे लॉकडाउन पर्याय असू शकत नाही, लॉकडाउन करणार नाही" असे राजेश टोपे यांनी सांगितले. 

"फक्त कोणीही सहजतेने कुठल्या गोष्टी घेऊ नयेत. चलता है अ‍ॅटिट्यूड सोडला पाहिजे" असे राजेश टोपे म्हणाले. मास्क घातला नाही, म्हणून ४२ कोटी रुपये दंड वसूल केला त्याकडे राजेश टोपे यांनी लक्ष वेधले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com