मुंबई विमानतळावर अमली पदार्थ जप्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

मुंबई - केंद्रीय अन्वेषण विभागाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहा कोटींचे "एम्फेटामाईन' हे अमली पदार्थ जप्त केले. ते बॅंकॉकला नेण्यात येत होते. यात चेन्नईतील टोळी सामील असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे.

दहा किलो अमली पदार्थांसह व्यंकटेश पेरियासम (वय 25) याला अटक करण्यात आली. तो तमिळनाडूतील सिंगलादांपुरम येथील रहिवासी आहे. एक संशयित तरुण अमली पदार्थासह छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्याला सापळा रचून पडकण्यात आले. त्याच्याकडे 70 पाकिटे सापडली. त्यात खडीसाखरेसारखा पदार्थ असल्याचे दिसले. चाचणी घेतल्यावर तो "एम्फेटामाईन' असल्याचे निष्पन्न झाले. एकूण नऊ किलो 900 ग्रॅम वजनाच्या अमली पदार्थाची किंमत दहा कोटी रुपये आहे.

Web Title: mumbai news drugs seized on airport