साडेसात कोटींचे अमली पदार्थ जप्त

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 मार्च 2018

मुंबई - मुंबई विमानतळावर केलेल्या कारवाईत सहार पोलिसांच्या विशेष पथकाने 300 किलोचा 'मागोवा' हा अमली पदार्थ जप्त केला. त्याची किंमत सुमारे साडेसात कोटी रुपये एवढी आहे. याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली असून, तोफिक अली, उमर मोहम्मद, अबिद खान, मोहम्मद गाबो, जॅकलिन न्यॅमवॉंगे, झकरिया अब्दुलाही, अब्राहिम मोहम्मद अशी त्यांची नावे आहेत. ते स्वीडन, केनिया आणि इथोपिया देशांचे नागरिक आहेत. त्यांना शनिवारी (ता. 24) न्यायालयात हजर केले जाणार आहे. हे सर्व जण टुरिस्ट व्हिसावर भारतात आले होते. आफ्रिका आणि केनियात मागोवा हा गांजासारखा अमली पदार्थ तयार केले जातो. त्याचा वापर नशा करण्यासाठी होते. असे पोलिसांनी सांगितले.
Web Title: mumbai news drugs Substance seized