Mumbai News: पबमध्ये मद्यधुंद तरुणींनी महिला पोलिसांना केली मारहाण, कोठडीत रवानगी

Mumbai News:  पबमध्ये मद्यधुंद तरुणींनी महिला पोलिसांना केली मारहाण, कोठडीत रवानगी

विरारमधील एका पबमध्ये मद्यधुंद तरुणींनी महिला पोलिसांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलिसांनी तीन महिलांना अटक केली. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली.

विरार पश्चिमेच्या गोकुळ टाऊनशीप येथे पंखा फास्ट नावाचा पब आहे. यामध्ये दोन गटांत मारामारी झाली होती. याबाबत माहिती मिळताच अर्नाळा सागरी पोलिस ठाण्याचे एक पथक घटनास्थळावर गेले होते. मात्र,मद्यधुंद महिलांनी या पथकालाच मारहाण केली.

Mumbai News:  पबमध्ये मद्यधुंद तरुणींनी महिला पोलिसांना केली मारहाण, कोठडीत रवानगी
Crime News : कुतुबखेडा येथे चोरटयांनी शेतकऱ्याचे हातपाय बांधून केली बेदम मारहाण

अर्नाळा पोलिस ठाण्याच्या अंमलदार उत्कर्षा वंजारी (वय २५) यांच्या तक्रारीनुसार, काव्या प्रधान (वय २२) हिने त्यांना मारहाण करून त्यांचा गणवेश फाडला, तसेच त्यांच्या हाताचा चावा घेतला, तर अश्विनी पाटील (वय ३१) हिने त्यांचे केस ओढले. त्याच्या मदतीसाठी पबमधील महिला सुरक्षारक्षक आकांक्षा भोईर गेल्या असता त्यांनादेखील धक्काबुक्की करत त्यांचा टी-शर्ट फाडण्यात आला

तिघींना एक दिवसाची पोलिस कोठडी

काव्या हिने पोलिस हवालदार मोराळे यांच्या डोक्यावर लोखंडी बादलीने मारले आणि मनगटाचा चावा घेतला. पूनम हिनेदेखील पोलिसांना धक्काबुक्की आणि मारहाण केली.

परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने अतिरिक्त पोलिस कुमक मागवून या तिघींना ताब्यात घेण्यात आले. या तिन्ही जणींवर गुन्हा दाखल करून अटक केली. त्यांना वसईच्या सत्र न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

Mumbai News:  पबमध्ये मद्यधुंद तरुणींनी महिला पोलिसांना केली मारहाण, कोठडीत रवानगी
Crime: 'विषारी गोमांस देऊन सासरच्यांना संपवले!' 8 हत्या करून महिलेने भर कोर्टात नाकारले आरोप; वाचा संपूर्ण प्रकरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com