Crime: 'विषारी गोमांस देऊन सासरच्यांना संपवले!' 8 हत्या करून महिलेने भर कोर्टात नाकारले आरोप; वाचा संपूर्ण प्रकरण

Erin Patterson: अनेक महिन्यांच्या तपासानंतर, पोलिसांनी 2021 ते 2022 दरम्यान या महिलेने तिच्या विभक्त पतीविरुद्ध केलेल्या आणखी तीन हत्येचे प्रयत्न उघडकीस आणले.
Erin Patterson
Erin Pattersonesakal

विषारी मशरूम मिश्रित गोमांस देऊन तिच्या सासरच्या लोकांची हत्या केल्याचा आरोप असलेल्या एका ऑस्ट्रेलियन महिलेने ती मंगळवारी हत्येच्या आरोपात दोषी नसल्याची कबुली दिली, असे न्यायालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

जुलै 2023 मध्ये कथितरित्या विषारी दिलेल्या विषारी जेवणामुळे तिचे सासू-सासरे, तसेच स्थानिक पाद्रीच्या पत्नीचा मृत्यू झाला होता.

या 49 वर्षीय महिलेवर तिने तिच्या विभक्त पतीला चार वेळा ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही आहे. पण तिने मेलबर्न न्यायालयाला सांगितले की ती या सर्व आरोपांविरुद्ध न्यायलयात लढायला तयार आहे.

न्यायालयीन अधिकाऱ्यांनी सांगितले की, जगभरातील वृत्तपत्रांमध्ये स्थान मिळवलेल्या या घटनेचा खटला आता व्हिक्टोरियाच्या सर्वोच्च न्यायालयात जलदगतीने चालवला जाणार आहे.

पॅटरसनने कथितरित्या विषारी मशरूम मिश्रित गोमांस तिचे विभक्त सासरे, सासू आणि स्थानिक पाद्रीच्या पत्नीला खायला दिले होते. ज्यामुळे त्यांच्या मृत्यू झाला होता.

Erin Patterson
Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

दरम्यान पोलिसांनी यापूर्वी न्यायलयाला दिलेल्या माहितीमध्ये सांगितले आहे की, तिने दिलेल्या जेवणामंध्ये प्राणघातक डेथ कॅप मशरूमचा समावेश होता. या प्रकरणाला बळी ठरलेल्या तिघांचा जेवणानंतर दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला होता. तर एक व्यक्ती महिनाभर रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर बरा झाला होता.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी महिलेचा पती सायमन पॅटरसन देखील 2021 आणि 2022 मध्ये चार वेगवेगळ्या प्रसंगी त्याच्या विभक्त पत्नीने दिलेले जेवण केल्यानंतर आजारी पडला होता. त्यानंतर त्याने पत्नीवर हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता.

Erin Patterson
Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

या जेवणानंतर जेवण केलेले सर्व लोक आजारी पडले पण आरोपी महिलेला काहीही झाले नाही. त्यानंतर पोलिसांना संशय आल्याने त्यांनी आरोपी महिलेला अटक केली होती.

अनेक महिन्यांच्या तपासानंतर, पोलिसांनी 2021 ते 2022 दरम्यान या महिलेने तिच्या विभक्त पतीविरुद्ध केलेल्या आणखी तीन हत्येचे प्रयत्न उघडकीस आणले आणि नोव्हेंबरमध्ये तिला अटक करण्यात आली. पुढे तिच्या एकूण आठ गुन्ह्यांचा आरोप ठेवण्यात आला.

तिची केस आता मेलबर्नमधील व्हिक्टोरियाच्या सर्वोच्च न्यायालयासोमोर ठेवण्यात आली आहे. याप्रकरणी पहिली सुनावनी 23 मे रोजी होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com