डीएसकेविरोधात मुंबईतील 200 जणांची तक्रार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

मुंबई - पुण्यातील बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी ऊर्फ डीएसके यांच्याविरोधात मुंबईत आतापर्यंत 200 हून अधिक तक्रारदार पुढे आले आहेत. कोल्हापूर आणि पुण्यापाठोपाठ मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनेही (ईओडब्ल्यू) नुकताच डीएसके यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. 

डीएसकेंनी गुंतवणूक योजना राबवल्या होत्या. ठेवींवर 12 ते 14.4 टक्‍क्‍यांचे व्याज देण्याचे आश्वासन गुंतवणूकदारांना दिले होते. एका गुंतवणूक योजनेतील पाच वर्षे मुदत ठेवींवर दुप्पट परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणातील मुख्य तक्रारदार अमृता घाटकर यांनी आपले वडील सुधाकर घाटकर यांच्या निवृत्तीनंतर मिळालेले 10 लाख 52 हजार डी. एस. कुलकर्णी यांच्या कंपनीत गुंतवले होते. "आपल्याला 2014 पर्यंत नियमित परतावा मिळाला; पण त्यानंतर पैसे मिळाले नाहीत', असे अमृता यांनी तक्रारीत म्हटले आहे. 

Web Title: mumbai news DSK