धुळीमुळे दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका

धुळीमुळे दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका

नवी मुंबई - नेरूळ-जेएनपीटी राष्ट्रीय महामार्गावर मातीची ने-आण करणाऱ्या डम्परचालकांकडून नियमांची पायमल्ली होत असल्याने दुचाकीस्वारांचे जीव धोक्‍यात आले आहेत. या मार्गावरून माती घेऊन जाणाऱ्या डम्परवर कापडाने झाकले जात नसल्याने मोठ्या प्रमाणात धूळ उडते. ती दुचाकीस्वारांच्या डोळ्यात जात असल्याने त्यांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. अशा वाहनांवर कारवाई करण्याचे आश्‍वासन वाहतूक पोलिसांनी दिले होते; परंतु ते पाळले नसल्याने अशा डम्परचालकांचे फावले आहे.

सायन-पनवेल महामार्गावरील उरण फाटा येथून जेएनपीटीकडे ३४८ ‘ए’ हा राष्ट्रीय महामार्ग जातो. पाम बीच मार्गावरील किल्ले गावठाण या परिसरातून हा मार्ग तरघर, उलवे, गव्हाण मार्गे जेएनपीटीकडे जात असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात रहदारी असते. त्यात दुचाकीस्वारांचेही प्रमाण जास्त आहे. मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू असून, सर्वाधिक वाहतूक डम्परची असते. महामार्गालगतच्या उलवे टेकडीवर सध्या सिडकोमार्फत विमानतळासाठी टेकडी सपाटीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. सपाटीकरणाच्या कामातून निघालेली माती व दगड डम्परमधून नेली जात आहे; परंतु मातीची ने-आण करताना डम्पर कापडी अथवा प्लास्टिकने झाकले जात नसल्याने वारे आणि हादऱ्याने मोठ्या प्रमाणात धूळ उडते. ती पाठीमागून येणाऱ्या दुचाकीस्वारांच्या डोळ्यात जाते. डम्परचालकांच्या या बेदकारपणामुळे उलवे मार्गावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. अशा धुळीतून वाट काढताना दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. नियमानुसार मातीची डम्परमधून वाहतूक करताना ती झाकणे गरजेचे आहे; मात्र वाहतूक पोलिसांकडून अशा डम्परवर कोणतीच कारवाई करत नसल्याने माती रस्त्यावर पडते. बऱ्याचदा असे डम्पर वाहतूक पोलिसांच्या समोरून बिनधास्त जातात. त्यामुळे अपघात झाल्यावर वाहतूक विभागाला जाग येणार का, असा प्रश्‍न दुचाकीस्वार विचारत आहेत. याबाबत वाहतूक पोलिस उपायुक्त नितीन पवार यांना विचारले असता, त्यांनी काही दिवसांतच अशा डम्परवर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले होते; मात्र ते अद्याप पाळलेले नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com