विद्यार्थ्यांच्या दप्तरांच्या ओझ्यासाठी मुख्याध्यापक दोषी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

मुंबई - गुरुवारी शाळेचा पहिला दिवस भरण्याची लगबगीत शिक्षक मग्न असताना बुधवारीच शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या दप्तरांबाबत दट्टा दिला. विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे वाढल्यास मुख्याध्यापकांनाच जबाबदार धरले जाणार असल्याची दट्टेबाजी शिक्षण विभागाने केली आहे.

मुंबई - गुरुवारी शाळेचा पहिला दिवस भरण्याची लगबगीत शिक्षक मग्न असताना बुधवारीच शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या दप्तरांबाबत दट्टा दिला. विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे वाढल्यास मुख्याध्यापकांनाच जबाबदार धरले जाणार असल्याची दट्टेबाजी शिक्षण विभागाने केली आहे.

बुधवारी शिक्षण विभागाने याबाबतचा आदेश काढून शाळांना विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याचा आदेश दिला. दप्तराचे ओझे कमी राहील, यासाठी उपाययोजना करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांनी घ्यावी, असा स्पष्ट आदेश शिक्षण विभागाने दिला आहे. दप्तराच्या ओझ्यापासून सुटका होण्यासाठी शाळा स्तरांवर प्रयत्न केले जावे, यामध्ये काही त्रुटी राहिल्यास मुख्याध्यापकावर कारवाई केली जाईल. तसेच या प्रकरणी शाळेच्या कामकाजात लक्ष देणा-या नियामक मंडळाने नामनिर्देशित केलेल्या संचालकांवरही कारवाईचा बडगा उठेल.

या आदेशाने शिक्षण विभाग आपली जबाबदारी ढकलत असल्याचा आरोप मुख्याध्यापकांनी केली. अनेक ठिकाणी मुलांच्या दप्तरांमध्ये काय सापडले, या गोषटीही बाहेर आल्या आहेत. याबाबत पालकांची मुख्य जबाबदारी लक्षात घ्यायला हवी. आपले मूल शाळेत दप्तरांतून काय घेतले जाते, याकडे पालकांनी लक्ष द्यायला हवे. दप्तराच्या वजनाच्या प्रश्‍नी पालकांनी जबाबदारी घ्यावी. पुस्तकांऐवजीही कित्येकदा विद्यार्थी नको त्या गोष्टी दिसून येतात. पालकांनी शाळेत जाण्यापूर्वी मुलांचे दप्तर तपासल्यास अनेक नको त्या गोष्टी शाळेत येणार नाही, असे मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडिज यांनी सांगितले.
काय आहे आदेश -

यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासून प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिका-यांनी विद्यार्थ्यांच्या दप्तरांची तपासणी करावी. त्याचा अहवाल शिक्षण संचालक पुणे कार्यालयाला दिला जावा. राज्यातील सर्व शाळांचाअहवाल महिण्याच्या पंधरा तारखेला शिक्षण संचालकांकडूून शिक्षण विभागाला दिला जावा. दप्तराच्या ओज्यातून विद्यार्थ्यांची सुटका होण्यासाठी शाळास्तरावरुन उपाय व्हायला हवे. या उपायांध्ये त्रुटी आढळल्यास मुख्याध्यापक आणि संबधित संचालक यासाठी जबाबदार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: mumbai news education news marathi news maharashtra news