ड्यूटी लिस्ट न भरणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन कापले 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 मार्च 2018

मुंबई - हजेरीच्या ऑनलाईन पद्धतीला विरोध करणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांना आयुक्त अजोय मेहता यांनी चांगलाच दणका दिला आहे. ऑनलाईन ड्यूटी लिस्ट न भरणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन कापण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांनी नियमानुसार ड्यूटी लिस्ट भरल्यास त्यांना तत्काळ वेतन देण्यात येइल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

महालिकेने कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी बायोमेट्रिक पद्धत सुरू केली आहे. तसेच कर्मचाऱ्यांना त्यांचा ड्यूटी चार्ट ऑनलाईन भरायचा आहे. मात्र अनेक कर्मचारी या पद्धतीला विरोध करत आहेत. दोन-तीन महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. मात्र या वेळी प्रशासनाने कठोर भूमिका घेत ऑनलाईन ड्युटी चार्ट न भरणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन कापले. नव्या पद्धतीबाबत अनेक वेळा बैठका, चर्चा झाल्या. याबाबत सर्वांना सविस्तर माहितीही देण्यात आली आहे. मात्र तरीही या पद्धतीचा अवलंब करत नाहीत, अशा कर्मचाऱ्यांचे वेतन कापण्यात आले. त्यांनी ड्यूटी लिस्ट भरल्यास त्यांना तत्काळ वेतन देण्यात येईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

Web Title: mumbai news employee payment municipal commissioner