"ईव्हीएम'चा अहवाल देण्याचे न्यायालयाचे निर्देश 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

मुंबई - तीन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये गैरप्रकार झाल्याच्या आरोपांबाबत इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांचा (ईव्हीएम) न्यायवैद्यक अहवाल दाखल करण्याचे निर्देश आज मुंबई उच्च न्यायालयाने दिले. पुण्यातील पर्वती मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत कॉंग्रेसचे उमेदवार अभय छाजेड यांनी केलेल्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी झाली. हैदराबादमधील प्रयोगशाळेत "ईव्हीएम'ची तपासणी पूर्ण झाली असून, अहवाल घ्यायचा आहे, अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली. याचिकेवर दोन आठवड्यानंतर सुनावणी होणार आहे. अहवाल दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

Web Title: mumbai news EVM court