Mumbai : भर रस्त्यात नग्न बाबाचा कारनामा, कल्याण पश्चिमेतील घटना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

Mumbai : भर रस्त्यात नग्न बाबाचा कारनामा, कल्याण पश्चिमेतील घटना

डोंबिवली : कल्याण पश्चिमेत रात्री 11.30 च्या सुमारास भर रस्त्यावर पूर्ण नग्न होत एक व्यक्ती आग लावून समोर वाट्या मांडून त्यात काही साहित्य टाकत होता. नग्न बाबाचा हा रस्त्यातील कारनामा बघण्यासाठी वाहनचालक देखील वाहन थांबून थांबून नेत होते. अर्धा तास बाबाचा हा उद्योग सुरू होता त्यानंतर एका व्यक्तीने पोलिसांना याची माहिती दिल्याने पोलिसांनी बाबाला तेथून हटविले. मानसिक दृष्ट्या ठीक नसलेला हा बाबा भर रस्त्यात जादूटोणा करत होता अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगली होती.

कल्याण पश्चिमेतील आग्रा रोड परिसरात दीपक हॉटेल जवळ एक व्यक्ती नग्न अवस्थेत भर रस्त्यात रात्री बसली होती. लाकडाच्या तुकड्यांना आग लावत समोर स्टीलच्या वाट्या मांडून तो त्यात काही सामुग्री टाकत होता. भर रस्त्यात नग्न होत ही व्यक्ती काय करते म्हणून पहाण्यासाठी काही नागरिकांनी जवळ जाऊन देखील पाहिले पण नंतर त्यांनी तेथून काढता पाय घेतला. रस्त्यातच बाबा ने ठिय्या मांडल्याने ये जा करणाऱ्या वाहनांना त्याचा अडथळा येत होता. वाहनचालक देखील थांबून थांबून बाबा काय करत आहे ते पहात होते.

पूजेसाठी लागणारी काही सामुग्री बाबा जवळ दिसत असल्याने हा जादूटोणा करत आहे अशी चर्चा रंगली. तब्बल अर्धा तास बाबाचा हा विधी सुरू होता. मोहने परिसरातील समीर वानखेडे हे येथून जात असताना त्यांनी हे पाहिले, यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याने त्यांनी याची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पहाणी करत या माथेफिरू बाबाला तेथून हुसकावून लावत वाहनांनारस्ता मोकळा करून दिला.