Mumbai News: दोन नगरसेवकांची भाजपातून हकालपट्टी, बावनकुळेंच पत्र व्हायरल

Mumbai News: दोन नगरसेवकांची भाजपातून हकालपट्टी, बावनकुळेंच पत्र व्हायरल

Loksabha News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षविरोधी कृत्य केल्याचा ठपका ठेवत शहापुर व मुरबाड नगरपंचायतच्या दोन नगरसेवकांची भाजपातून हकालपट्टी केल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वाक्षरीचे पत्र आज समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

भिवंडी लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार कपील पाटील यांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना भाजपातील पक्षशिस्त व अनुशासन भंग करणारे कृत्य केले असल्याचा ठपका ठेवत शहापूर नगरपंचायतचे नगरसेवक हरेश पष्टे व मुरबाड नगरपंचायतचे नगरसेवक राम दुधाळे यांना आज अखेर भाजपातून निष्कासीत केल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वाक्षरीचे पत्र आज समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

अजूनही काही जबाबदार कार्यकर्ते, पदाधिकारी किंवा नगरसेवक पक्षकार्य व निवडणुकीच्या कामात सक्रीय सहभागी न होता पक्षाविरोधी कामे करतात अशांची नावे समोर येत आहेत त्यांना सूचना देताना त्यांनी कोणत्याही प्रकारची कुचराई न करता निवडणुकीच्या कामात सहभागी व्हावे अन्यथा नाईलाजाने पक्ष शिस्तभंगाची कारवाई करावी लागणार असल्याचे पत्र भाजपाचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष मधुकर मोहपे यांनी प्रसिद्ध केले आहे.

पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचे काम न करता अन्य उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या अनेकांचे या कारवाईने धाबे दणाणले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com