बनावट कॉल सेंटरमध्ये दहावी नापास मिळवतात दरमहा दीड लाख

मंगेश सौंदळकर
शुक्रवार, 9 जून 2017

दहावी, बारावीत नापास झालेली मुले येथून दीड ते दोन लाख रुपये मिळवत असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई : अमेरिकन कंपनीकडून कर्ज मिळवून देतो असे सांगून लोकांकडून पैसे उकणाऱ्या कॉल सेंटरवर छापा टाकून पोलिसांनी त्यांचे पितळ उघडे पाडले आहे. दहावी, बारावीत नापास झालेली मुले येथून दीड ते दोन लाख रुपये मिळवत असल्याची माहिती समोर आली आहे.

अंबरनाथ एमआयडीसी येथील कॉल सेंटरवर गुरुवारी रात्री ठाणे पोलिसांनी धाड टाकली. येथे सुरू असलेल्या कॉल सेंटरचा त्यांनी पर्दाफाश केला. अमेरिकन फायनान्स कंपनीचे नाव सांगून त्यांच्याकडून कर्ज मिळवून देतो असे सांगून फसवणूक करण्यात येत होती. 

दहावी, बारावी नापास झालेले 25 जण या कॉल सेंटरमध्ये काम करतात. येथून हार्ड डिस्क, पेन ड्राईव्ह ठाणे पोलिस पुढे तपास करीत आहेत. 
 

Web Title: mumbai news fake call center unexposed police