गोरेगावमध्ये पुन्हा पेटला वणवा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

मुंबई - संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ असलेल्या खासगी जमिनीवरील जंगलात शुक्रवारी वणवा पेटला. गोरेगाव येथील फिल्मसिटीत रहेजा डेव्हलपमेंटच्या जागेतील डोंगरात वणवा पेटल्याचे नजीकच्या वसाहतीतील प्रत्यक्षदर्शींनी पाहिले.

फिल्मसिटीतील पट्ट्यातील बहुतांश बिल्डिंगमधून जंगलात लागलेला वणवा स्पष्टपणे दिसत होता. याबाबतीत गोरेगाव रहिवाशांनी ट्‌विटरवरून मुंबई पोलिसांकडे व वन विभागाच्या हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार केली. गोरेगावच्या पट्ट्यात जंगलाला आग लागणे नेहमीचेच झाल्याने आपण कमालीचे संतापल्याची तक्रारही संबंधितांनी "सकाळ'कडे केली.

सहा महिन्यांपासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पट्ट्यात आग लागत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान होत असल्याची खंत गोरेगाववासीयांनी केली. दोन आठवड्यांपूर्वीच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या ठाणे व मुलुंड पट्ट्यात मोठी आग लागली होती. या आगीत उद्यानातील 23 हेक्‍टर जमीन जळून खाक झाली होती.

Web Title: mumbai news fire