पर्ससीन मच्छीमारांना समुद्रातच झोडपून काढू 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

मुंबई - पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांची परिस्थिती आता बिकट झाली आहे. पर्ससीन जाळ्यांद्वारे होणारी बेकायदा मासेमारी बंद झाली नाही, तर पर्ससीन मच्छीमारांना समुद्रातच झोडपून काढू, असा इशारा अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने दिला आहे. 

शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छीमारांची परिस्थितीही हलाखीची असून, त्यांच्यावर बेरोजगारीचे संकट आहे. मच्छीमारांवरील एक हजार कोटींचे जुने कर्ज माफ करेपर्यंत त्यांना तातडीने शंभर कोटींचे सानुग्रह अनुदान मंजूर करावे, अशी मागणी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी केली. या मागणीला मत्स्य विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे लवकरच हा निधी मिळेल, अशी आशाही तांडेल यांनी व्यक्त केली. 

परप्रांतीयांच्या नौका व पर्ससीन नौकांच्या विरोधात आमदार नीतेश राणे यांनी मत्स्यव्यवसाय अधिकाऱ्यांवर मासे फेकणे ही केवळ स्टंटबाजी होती, अशी टीकाही अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने केली. आमदार राणे यांना मच्छीमारांचा आताच पुळका का आला, असा प्रश्‍नही अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने विचारला. कर्जमाफीच्या प्रश्‍नासंबंधी भाईंदर येथे गुरुवारी (ता. 27) मोठा मेळावा घेणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.

Web Title: mumbai news Fisherman