मुंबईत पुन्हा धुरक्‍याची चादर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

मुंबई - राज्यात दोन कमी दाबाच्या पट्ट्यांच्या प्रभावामुळे मंगळवारी ढगाळ वातावरणासह धुरक्‍याचा प्रभाव मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर दिसून आला. उद्या (बुधवारी) दक्षिण कोकण व मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह अवकाळी पावसाची शक्‍यता आहे.

शनिवारपासून अरबी समुद्रालगत दोन कमी दाबाचे पट्टे दिसून येत आहेत. मालदीव ते अरबी समुद्राचा मध्य भाग आणि कर्नाटक या कमी दाबाचा पट्टा प्रभावी होत असताना त्याची व्याप्ती आता कर्नाटकपर्यंत दिसून येत आहे.

दोन भागांत विभागलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने राज्यातील वातावरणात मंगळवारपासून बदल केला आहे. मुंबईत मंगळवारची सकाळ बहुतांश भागांत धूसर दृश्‍यमानतेत दिसून आली. दृश्‍यमानता खालावताच मुंबईतील चार स्थानकांतील हवेचा दर्जा पुन्हा खालावला. भांडुप येथील हवेचा दर्जा 317, बोरिवली 329, बीकेसी 317 आणि नवी मुंबईत 322 एवढे सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण होते. बुधवारीही हेच वातावरण कायम राहील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याचे उपमहासंचालक के. एस. होसाळीकर यांनी व्यक्‍त केला. बुधवारनंतर अवकाळी पावसाला दोन-तीन दिवसांचा ब्रेक राहील. त्यानंतर शनिवारी राज्यातील बहुतांश भाग अवकाळी पाऊस व्यापून टाकेल. दक्षिण कोकण, दक्षिण-मध्य महाराष्ट्रसह मराठवाडा, विदर्भातील काही भागांतही अवकाळी पावसाची शक्‍यता आहे.

Web Title: mumbai news fog environment rain cold