रस्त्यांवरील खाद्यविक्रेत्यांना प्रशिक्षण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

मुंबई - राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने "सर्व्ह सेफ फूड' या प्रकल्पाअंतर्गत रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठीच्या मोबाईल व्हॅनचे; तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नव्या वाहनांचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज विधान भवन परिसरात झाले.

या वेळी फडणवीस म्हणाले, 'चांगले आरोग्यदायी खाद्यपदार्थ हवे असतील तर, या विक्रेत्यांना प्रशिक्षण देणे आवश्‍यक आहे. त्यासाठी रस्त्यांवरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना प्रशिक्षणासाठी मोबाईल व्हॅन उपयुक्त ठरणार आहे.'' अन्न व औषध प्रशासन व नेस्ले इंडिया यांच्यामार्फत नॅशनल असोसिएशन ऑफ स्ट्रिट वेंडर्सच्या (नास्वी) सहकार्याने राज्यातील सुमारे 3 हजार 600 खाद्यपदार्थ विक्रेत्यांना चांगले, स्वच्छ व आरोग्यदायी अन्न पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार असून, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठीही याद्वारे प्रयत्न होतील.

Web Title: mumbai news food sailer training devendra fadnavis