Mumbai News: दसरा मेळाव्यामुळे दक्षिण मुंबईत ट्रॅफिक जाम; गाड्यांच्या पार्किंगसाठी जागा मिळेना

Mumbai News
Mumbai News

मुंबई, ता. २५ - आझाद मैदानात शिंदे गटाचा दसरा मेळावा असल्याने आज दुपारपासून मैदानाकडे गाड्या येवू लागल्या आहेत. आजाद मैदान परिसरात दुपारपासूनच गर्दी होवू लागली आहे. संध्याकाळी मेळाव्याच्या निमित्ताने मुंबई पाहण्यासाठी मोर्चात आलेले लोक मोठ्या प्रमाणात होते. फोर्ट परिसरात वाहतूक कोंडी झाली होती.

दस-याच्या निमित्याने आज सुट्टी असल्याने शासकीय कार्यालये बंद होती. मात्र कार्पोरेट आणि खाजगी क्षेत्र सुरू होते. आज सार्वजनिक सुट्टी असल्याने मुंबईत फिरण्यासाठी आणि नातेवाईकांकडे जाण्यासाठी लोक बाहेर पडले होते. त्यात मेळाव्यासाठी आलेल्या लोकांच्या गर्दीची भर पडली होती. त्यामुळे दक्षिण मुंबई गर्दीने फुलून गेली.

Mumbai News
Lalit Patil Drug Case: MD ड्रग्जचा प्रवास मुंबई व्हाया नाशिकमध्ये! सामनगाव गुन्ह्यात आणखी एकाला मुंबईतून अटक

मेळाव्यासाठी आलेल्या गाड्या बॅलार्ड पिअर, रिझर्व बॅंक आणि ऐलो गेट या परिसरात पार्क केल्याचे दिसून आले. तेथून चालत लोक मेळाव्याच्या ठिकाणी येत होते. हा परिसर माणसांनी फुलून गेला होता. मात्र आज मोर्चेकऱ्यांच्या गाड्यामुळे फोर्टच्या परिसरात वाहतूक कोंडी झाली होती.

Mumbai News
Dasra Melava: दसरा मेळावा पार्श्वूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांकडून अधिसूचना जारी !

फॅशन स्ट्रीटवर गर्दी

फॅशन स्ट्रीटवर आज मोर्चेकरी मोठ्या प्रमाणात दिसत होते. काहीजण खरेदी करीत होते. फॅशन स्ट्रीटचा परिसर गर्दीने फुलून गेला होता. कधी नव्हे इतकी गर्दी आज फॅशन स्ट्रीटवर जमा होती. फॅशन स्ट्रिट आणि पालिका मार्ग व्हीआयपींसाठी मोकळा ठेवला होता. तेथे वाहनांस पूर्णपणे बंदी होती. (Latest Marathi News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com