फसवणूकप्रकरणी चौघांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

मुंबई - विविध प्रलोभने देत तब्बल 11 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने एकाच कुटुंबातील चार व्यावसायिकांना मंगळवारी अटक केली. आरोपींनी तक्रारदार व त्यांच्या वडिलांकडून ही रक्कम घेतली होती; मात्र ठराविक मुदत उलटूनही ती परत केली नसल्याची तक्रार नोंदवली आहे. किरीट सत्रा, भरत सत्रा, कल्पेश सत्रा व हरेश सत्रा अशी आरोपींची नावे असून, त्यांना गिरगाव पोलिसांनी अटक केली आहे. 

जयेश गाला (वय 42) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गाला व सत्रा यांची पूर्वीपासून ओळख आहे. जानेवारी 2015 मध्ये किरीट व हरेश यांनी गाला यांच्याकडून पेपर आयात करण्यासाठी दोन कोटींची मागणी केली. त्यावर विश्‍वास ठेवत गाला यांनी दीड टक्के व्याजावर ही रक्कम दोन महिन्यांसाठी दिली. दोन महिन्यांनंतर रकमेची मागणी केली असता, आरोपींनी टाळाटाळ करत कारणे देण्यास सुरुवात केली. रक्कम न देता आल्याने सत्रा कुटुंबीयांनी त्यांचे गोदाम गाला यांना विकत देण्याची तयारी दर्शवली. बाजारभावाप्रमाणे गाळ्याची किंमत जास्त असल्याने आरोपींनी गाला यांच्याकडे अधिक 3 कोटींची मागणी केली. 

जयेश गाला यांच्या वडिलांकडूनही सत्रा कुटुंबीयांनी सहा कोटी रुपये घेतले होते. अन्य एका प्रकरणातही त्यांनी 50 लाखांची रक्कम घेतली होती, ती परत करण्यासाठीचे दिलेले धनादेशही बॅंकेत वटले नाहीत. या प्रकरणाला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरही सत्रा कुटुंबीयांनी उर्वरित रक्कम परत केली नाही. त्यामुळे अखेर गाला यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली.

Web Title: mumbai news Four arrested for cheating