फरारी आरोपीला विमानतळावर अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

मुंबई - गंभीर गुन्ह्यात फरारी असलेल्या आरोपीला सहार पोलिसांनी मंगळवारी (ता. 12) रात्री अटक केली. सारथबाबू पी. बाबू असे त्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात केरळ पोलिसांनी "लूक आउट' नोटीस जारी केली होती. पुढील तपासाकरिता त्याला केरळ पोलिसांनी ताब्यात घेत ट्रान्झिस्ट रिमांडवर नेले. सारथबाबू हा मूळचा केरळचा आहे. 2011 मध्ये त्याच्याविरोधात अलापुझाच्या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

पोलिसांनी शोध घेऊनही सारथबाबू हाती लागला नव्हता. अखेर पोलिसांनी त्याच्याविरोधात लूक आउट नोटीस जारी केली. तो सिंगापूरहून मुंबईला येणार असल्याची माहिती केरळ पोलिसांना मिळाली. त्यांनी याबाबत सहार पोलिसांना कळविले. मंगळवारी (ता. 12) सायंकाळी सारथबाबू सहार विमानतळावर पोचल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

Web Title: mumbai news Fugitive accused criminal arrested crime