पीडित मुलीची चौकशी केल्याने कोर्टाची नाराजी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

मुंबई - अंधेरीतील आंतरराष्ट्रीय शाळेमधील अत्याचार झालेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीला आणि तिच्या पालकांना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावणाऱ्या अंधेरी पोलिसांवर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. पोलिसांना कायद्याची माहिती नाही का, असा सवाल न्यायालयाने केला.

अल्पवयीन बालकांच्या लैंगिक छळाबाबत केलेल्या तक्रारींमध्ये पोलिसांनी पीडित, त्यांचे पालक आणि साक्षीदारांना पोलिस ठाण्यात जबाब नोंदवण्यासाठी बोलवण्यास पॉस्को (बाललैंगिक शोषण प्रतिबंधक कायदा) कायद्यानुसार मनाई आहे; मात्र तरीही अंधेरी पोलिसांनी मुलीला आणि तिच्या पालकांना पोलिस ठाण्यात वारंवार चौकशीसाठी बोलावल्याचे याचिकाकर्त्यांनी बुधवारी (ता. 28) न्या. रेवती मोहिते-ढेरे यांच्या निदर्शनास आणले. पोलिस असे कसे करू शकतात, त्यांना कायद्याची माहिती नाही का, असे प्रश्‍न न्यायालयाने उपस्थित केले. अशाप्रकारे काम होत असेल, तर तक्रारदार किंवा पीडित फिर्यादीसाठी पुढे येणार नाहीत, असे मतही न्यायालयाने व्यक्त केले. फ्रेंचचा नागरिक असलेल्या विश्‍वस्ताविरुद्ध पीडितेच्या आईसह अन्य पालकांनी याचिका केली आहे.

Web Title: mumbai news girl court