'फटका गॅंग'मुळे तरुणी जखमी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

मुंबई - लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर काठीने हल्ला करणाऱ्या फटका गॅंगच्या कृत्यामुळे द्रविता सिंग (रा. कल्याण) ही तरुणी जखमी झाल्याची घटना बुधवारी मशीद बंदर-सॅंडहर्स्ट रोड स्थानकादरम्यान घडली. तिचा मोबाईल फोन घेऊन पळालेल्या एका अल्पवयीन मुलाला सीएसएमटी रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

द्रविता आज लोकलने सीएसटीला जात होती. प्रवासादरम्यान तिला मोबाईलवर फोन आला. नीट ऐकू येत नसल्याने ती लोकलच्या दरवाजात उभी राहिली. लोकल मशीद बंदर-सॅंडहर्स्ट रोड स्थानकादरम्यान एका अल्पवयीन मुलाने तिच्या डोक्‍यावर काठीने हल्ला केला. त्यामुळे द्रविता लोकलमधून खाली पडली. ती उभी राहण्याचा प्रयत्न करत असतानाच दुसऱ्या लोकलने तिला धडक दिली. त्यामुळे ती जबर जखमी झाली. दरम्यानच्या काळात त्या मुलाने द्रविताचा 18 हजार रुपये किमतीचा मोबाईल घेऊन पळ काढला.

Web Title: mumbai news girl injured fataka gang local