इमारतीवरून उडी मारून तरुणीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 मार्च 2018

मुंबई - ताडदेव येथील एम. पी. मिल कंपाउंडमधील इमारतीच्या 13व्या मजल्यावरून उडी मारून महिलेने आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे घडली. या प्रकरणी ताडदेव पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.

छाया कैलास बुतिया (वय 20) असे मृत तरुणीचे नाव आहे. गणेश इमारतीच्या नवव्या मजल्यावर ही महिला कुटुंबासोबत राहत होती. तीन फेब्रुवारीला तिचे लग्न झाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छाया ही गुरुवारी (ता. 15) रात्री झोपली. पहाटे 4.15 वाजता ती जागेवर नसल्याचे घरातल्यांच्या लक्षात आले. बाथरूम आतून बंद होते. त्यांनी दरवाजा तोडला. तेव्हा बाथरूमच्या खिडकीच्या काचा काढण्यात आल्या होत्या.

तेथून पाहिले असता ती बांबूवरून 13व्या मजल्यावर गेल्याचे दिसले. त्याच वेळी तेथून तिने उडी मारून आत्महत्या केली. यामध्ये तिच्या डोक्‍याला गंभीर जखम झाली. तिला तत्काळ नायर रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, डॉक्‍टरांनी तिला मृत घोषित केले.

Web Title: mumbai news girl suicide

टॅग्स