तैवानच्या दोघांकडून पावणेदोन कोटींचे सोने जप्त 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जुलै 2017

मुंबई - हवाई गुप्तचर विभागाने सहार विमानतळावर शुक्रवारी (ता. 28) पहाटे दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 1 कोटी 77 लाखांचे सोने जप्त केले. लिन हंग यु आणि त्सेंग हॉव चुन अशी त्यांची नावे आहेत. हे दोघे तैवानचे नागरिक आहेत. ते दोघेही पर्यटक व्हिसावर भारतात आले होते. सोने तस्करीकरता त्या दोघांना एक हजार अमेरिकन डॉलर  मिळणार होते. 

एआययूचे उपायुक्त प्रज्ञाशील जुमळे यांचे पथक सहार विमानतळावर गस्तीवर असताना लिन आणि त्सेंग हे हॉंगकॉंग येथून विमानाने सहार विमानतळावर उतरले. परदेशातील एका तस्कराने त्यांना एक हजार अमेरिकन डॉलरच्या मोबदल्यात 6 किलो सोन्याची तस्करी करण्यास सांगितले. त्यांनी कापडी बेल्टमध्ये सोने लपवले होते. एआययूच्या अधिकाऱ्यांनी संशयावरून त्यांना चौकशीकरता ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 6 किलो सोने जप्त केले. 

Web Title: mumbai news gold