सोने कारखान्यांचा "गुमास्ता' बंद 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जानेवारी 2018

मुंबई - दक्षिण मुंबईतील झव्हेरी बाजार येथील सोने गाळणाऱ्या प्रदूषणकारी कारखान्यांना गुमास्ता परवाना न देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्याचबरोबर तीन महिन्यांत कारखान्यांची सर्व धुराडी काढण्यात येणार आहेत. 

सोने गाळण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रसायनांच्या धुरामुळे झव्हेरी बाजार परिसरात प्रचंड प्रदूषण होते. परिणामी, या परिसरात दम्याच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या कारखान्यांविरोधात स्थानिक नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. मुख्यमंत्र्यांनी तीन महिन्यांत या समस्येवर तोडगा काढण्याचे आदेश महापालिकेला दिले होते. त्यानुसार महापालिकेने कारखान्यांची धुराडी काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तीन महिन्यांत ही कारवाई पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली.

Web Title: mumbai news gold Jhaveri Bazar